पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुन्हा एकदा रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या चर्चांना वेग

रणबीर कपूर आणि आलिय भट

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री आलिया भट आणि आणि अभिनेता रणबीर कपूर ही चर्चेतील जोडी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांमधील प्रेमसंबंध कायम चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या अफवा कायम पसरत असतात. पण आता नव्या वर्षात या दोघांचे लग्न व्हावे, यासाठी रणबीर कपूरचे आई-वडील ऋषि कपूर आणि नीतू कपूर इच्छुक आहेत. या दोघांच्या लग्नाची तयारीही काही प्रमाणात सुरू करण्यात आली असून, त्याचाच एक भाग म्हणून 'कृष्णाराज'वरील नूतनीकरणाचे काम लवकर व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

नात्यागोत्याचे राजकारणः जयंत पाटलांचा भाचा प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री

स्पॉट बॉयच्या वृत्तानुसार, कृष्णाराज या वास्तूच्या नूतनीकरणाचे काम झाल्यावर लगेचच रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाची तयारी वेगाने सुरू होणार आहे. या वास्तूतील तळघरातील काम २०२० मध्ये लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी नीतू कपूर प्रयत्नशील आहेत. या दोघांच्या लग्नानंतर घरातील पूजा याच ठिकाणी व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. नीतू कपूर अध्यात्मिक स्वरुपाच्या आहेत. गुरुजींच्या सांगण्यानुसारच त्या सर्व शुभकार्ये करण्याला प्राधान्य देतात.

नात्यागोत्याचे राजकारणः वडील मुख्यमंत्री, मुलगा आदित्य कॅबिनेट मंत्री

१९८० मध्ये पहिल्यांदा ऋषि आणि नीतू कपूर यांनी पाली हिलमधील ही वास्तू खरेदी केली होती. त्यांची अशी इच्छा आहे की शुभकार्य याच वास्तूमध्ये व्हावे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rishi kapoor and neetu kapoor makes plans ranbir alia post wedding puja at krishnaraj property