'सैराट' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मेकअप' या आगामी चित्रपटात रिंकू दिसणार असून अभिनेता चिन्मय उदगीरकरही तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. 'मेकअप' च्या निमित्तानं पहिल्यांदाच चिन्मय आणि रिंकू अशी आगळीवेगळी जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
#TanhajiMarathiTrailer : गोष्ट एका झंझावाताची
रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातही रिंकूचा बिनधास्त अंदाज दिसत असून तिचा हा 'मेकअप' कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. 'मेकअप'च्या निमत्तानं गणेश पंडित यांनी आपले पाऊल दिग्दर्शनाकडे वळवले आहे.
चिन्मय आणि रिंकूची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.