पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० : अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं

सडक

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा  देणारे  कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला. या निर्णयाचं अनेकांनी स्वागात केलं मात्र जम्मू काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण आहे. अनेक पर्यटकांना आपल्या घरी परत जाण्याचे आदेश दिले आहेत. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यामुळे बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं आहे. 

...म्हणून अक्षयला 'मिशन मंगल'च्या पोस्टरमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी 

आलिया भट्ट, संजय दत्तच्या 'सडक २' चं चित्रिकरण काश्मीरमध्ये होणार होतं, मात्र चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाहा'चं चित्रीकरण काश्मीर खोऱ्यात होणार होतं. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.  मात्र चित्रीकरणाच्या तारखा आता पुढे ढकलल्या आहेत. हे चित्रीकरण केव्हा सुरू होणार याबद्दल कल्पना नाही अशी माहिती अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीनं दिली. 

'अवतार' नाकारल्यानं झालेल्या ट्रोलिंगविषयी गोविंदा म्हणतो..

काश्मीर खोऱ्यात चित्रीत होणारे दोन ते तीन मोठे बॉलिवूड चित्रपट आहेत,  तर  एका मोठ्या तेलगू चित्रपटाचं चित्रीकरणही इथेच होणार होतं, मात्र सध्याची परिस्थिती पाहता काश्मीर खोऱ्यातील सर्व चित्रीकरणं रद्द करण्यात आली आहेत. परिस्थिती निवळेपर्यंत चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे , विलंब झाल्यास कदाचित दुसऱ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात येईल अशी माहिती एका निर्मिती संस्थेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीनं दिली. 

चित्रपटाचं चित्रीकरण असलं की स्थानिकांना रोजगार मिळतो, मात्र आता चित्रीकरणच बंद झाल्यानं रोजगाराचा प्रश्न उभा राहिला आहे,  अशी माहिती या व्यक्तीनं दिली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: revoke Article 370 of the Indian Constitution the Kashmir shoot schedule of may bollywood movie to be put on hold