पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रात्रीस खेळ चाले २ : 'अण्णा नाईक' करणार सैनिकांना मदत

माधव अभ्यंकर

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. या मालिकेतील अण्णा या व्यक्तिरेखेला प्रेक्षक आणि चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेमुळे अण्णांच्या चाहत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे इतकंच नव्हे तर त्यांच्या कामाची सर्वजण वाहवा करत आहेत. अण्णा म्हणजेच अभिनेता माधव अभ्यंकर यांनी मागील वर्षी एका चांगल्या कामासाठी पुढाकार घेतला. ज्या सैनिकांच्या जिवावर आपण निर्भयपणे जगतो त्या सैनिकांच्या मदतीसाठी माधव अभ्यंकर यांच्या पुढाकाराने 'रात्रीस खेळ चाले २'च्या सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला होता. यात जमा झालेला निधी सैनिकांच्या मदतीसाठी पाठवला जाणार आहे. मालिकेचे शूटिंग पाहायला येणाऱ्या फॅन्सचादेखील या उपक्रमाला इतका भरगोस प्रतिसाद मिळाला कि निधी गोळा करण्यासाठी आता तिसरा ड्रॉप बॉक्स ठेवण्यात आला आहे.

राज ठाकरे मराठी कलाकारांना जाणणारा ' जाणता राजा'- संजय नार्वेकर

रात्रीस खेळ चाले २ मालिकेचे शूटिंग सावंतवाडीपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर असलेल्या आकेरी या गावात सुरू आहे. अण्णा नाईक आणि शेवंतासह सर्व कलाकारांना पाहण्यासाठी व त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी सेटवर नेहमीच गर्दी होत असते. या गर्दीच्या सहभागाने आपल्या देशातील सैनिकांसाठी काही करता आले तर? अशी कल्पना माधव अभ्यंकर यांना सुचली. गेल्यावर्षी जानेवारीपासून त्यांनी सेटवर ड्रॉप बॉक्स ठेवायला सुरुवात केली. ‘सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट, सैनिकहो तुमच्यासाठी!’ असे या ड्रॉप बॉक्सवर लिहिले आहे. मी तुमच्यासोबत सेल्फी काढेन, पण आपल्या सैनिकांसाठी शक्य ती मदत करा, असे आवाहन अभ्यंकर यांनी चाहत्यांना केलं आणि पाहता पाहता या ड्रॉप बॉक्स मध्ये जवळपास लाखभर रुपयांचा निधी जमा झाला आहे. फॅन्सनीदेखील त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून अगदी ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत जो तो आपल्या परीने सैनिकांसाठी मदत केली.

निर्भयाची आई कंगनाच्या 'त्या' मताशी पूर्णपणे सहमत

हा उपक्रमाबद्दल राबवल्यानंतर आता हा निधी सैनिकांच्या स्वाधीन करण्याची वेळ आली आहे आणि हा निधी माधव अभ्यंकर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवशी एक मिलिटरी शाळेला देऊ करणार आहेत. याबद्दल बोलताना माधव अभ्यंकर म्हणाले, "सिंधुदुर्ग सैनिक शाळेत मला मागील महिन्यात वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते. मी तिथे गेल्यावर मला जाणवलं की इथून कितीतरी मुलं सैन्यात भरती होतात. ही संस्था माजी सैनिकांनी पुढाकार घेऊन स्थापन केली आहे. मी माझ्या रात्रीस खेळ चाले मालिकेच्या टीमशी सल्लामसलत केली. प्राणांची पर्वा न करता सीमेवर लढलेले सैनिक एकत्र येऊन आशा प्रकारची संस्था उभी करतात आणि अधिकाधिक मुलांना सैन्यात भरती होण्यासाठी तयार करतात अशा संस्थेला आपण निधी दिला पाहिजे असं मी त्यांना सुचवलं आणि सगळ्यांच्या संमतीने आम्ही आता पर्यंत जमलेला निधी येत्या २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवशी या संस्थेला देणार आहोत."

चित्रपटसृष्टीतल्या होतकरू तरुणांसाठी त्या तिघांचा स्तुत्य उपक्रम