पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिरसोबत शाहरुख- सलमानही?

'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिरसोबत शाहरुख- सलमानही?

 बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान  पुढील वर्षी 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटात करिना कपूर खान ही मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त आमिरसोबत शाहरुख- सलमानही दिसणार अशी चर्चा आहे. 

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं दीपिका- रणवीरचं देवदर्शन

शाहरुख खान आणि सलमान खान दोघंही 'लाल सिंग चड्ढा'मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती बॉलिवूड लाइफ या संकेतस्थळानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.  शाहरुखनं चित्रपटासाठी होकार दिलाय तर सलमानच्या उत्तराची आमिर वाट पाहत आहे. 

आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' डिसेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये होणार प्रदर्शित

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. अभिनेता अतुल कुलकर्णीनं या चित्रपटाची कथा लिहिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. या चित्रपटात आमिर एक शिख व्यक्तीरेखा साकारत आहे. २०२० साली  ख्रिस्मसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:report suggests that Aamir Khan is attempting to bring ShahRukh and Salman Khan in Laal Singh Chaddha