पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅन्सरमधून बचावलेल्या रवी जाधवच्या मुलाला वाढदिवशी मिळाली खास भेट

रवी जाधव

कॅन्सरमधून बचावलेल्या दिग्दर्शक रवी जाधवचा मुलगा अंश जाधवला १६ व्या वाढदिवशी खास भेट मिळाली आहे. अंशच्या वाढदिवशी त्याला स्टेम सेल दिलेल्या मोनिष शांतीलाल सारा यांच्याशी दात्री या स्वयंसेवी संस्थेने ऑनलाइन भेट घडवून आणली आहे. १४ वर्षांचा असताना अंश जाधवला अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमेनिया (ऑल) हा आजार झाला होता.

३३ वर्षीय मोनीष यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी स्टेम सेल दान केली होती. मोनीष यांनी दात्री संस्थेकडे २०१७ मध्ये नोंदणी केली होती. त्यांनी नोंदणी केल्यावर काही महिन्यांतच त्यांचे स्टेम सेल अंश जाधवला देण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच मोनीष आणि अंश यांची भेट घडवून आणण्यात आली. रजिस्ट्री प्रोटोकॉलनुसार दाता आणि रुग्ण यांची एक वर्ष ओळख करून दिली जात नाही. मात्र एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर दात्रीनं त्यांची ऑनलाईन भेट घडवून आणली. 

सचिनसोबत क्रिकेट खेळणाऱ्या रणबीरचा फोटो पाहिलात का?

'देवानं मला कोणाला तरी वाचवण्यासाठी निवडलं असावं. एखाद्याला मरणापासून वाचवणं यापेक्षा अमूल्य दूसरं काहीच असू शकत नाही. सुरुवातीला मी घाबरलो होतो. स्टेम सेल देणं म्हणजे अवघड काहीतरी असेल अशी भीती वाटायची. पण दात्रीकडून मला सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजावण्यात आली. त्यामुळे मला विश्वास वाटला आणि पत्नीच्या पाठिंब्यानं मी पुढचं पाऊल टाकलं. आज अंशला पाहून खूप आनंद झाला. माझा थोडा वेळ देऊन मी एक जगणं वाचवलं', अशा भावना  मोनीष यांनी व्यक्त केल्या. 

अंशच्या आजाराविषयी बोलताना त्याची आई मेघना अतिशय भावूक झाल्या. 'एक दाता मिळाला आणि आम्ही भाग्यवान ठरलो. अंशच्या आजाराविषयी कळल्यावर आम्ही अस्वस्थ झालो होतो. केमोथेरपी त्याच्यासाठी पुरेशी नव्हती आणि आमच्या कुटुंबातील कोणाच्या स्टेम सेल त्याला जुळत नव्हत्या. आमच्याकडे फार वेळही नव्हता. त्यामुळे आम्ही दुसऱ्या पर्यायांचा विचार करत होतो. त्याच्यावर उपचार करण्याच्या एक दिवस आधी डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी आमच्या आयुष्यातली सर्वांत आनंदाची बातमी दिली. अंशसाठी योग्य असा दाता दात्रीला मिळाला होता. ते क्षण आठवल्यावर आजही माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्या दात्याच्या रुपानं आम्हाला जणू देवच भेटला असं वाटतं. तो आनंद शब्दांत सांगता येणार नाही. अंशसारख्या कित्येक रुग्णांना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी दात्रीकडे नोंदणी करायला हवी,' असं मेघना यांनी सांगितलं. 

कंगनाची बहीण द्वेष पसरवते, ट्विटर बंद केल्याचं डिझायनरकडून समर्थन

अंशला मिळालेला दाता कुठल्यातरी बाहेरच्या राज्यातला असेल असं आम्हाला वाटत होतं. आता लॉकडाऊन संपल्यावर आम्ही मोनीष आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे प्रत्यक्ष आभार मानणार आहोत, असं रवी जाधव म्हणाले.