पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रवी म्हणतो, आकड्यांच्या फुगवट्यापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची

रवी जाधव

मुंबईतल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचं शिक्षण घेतलेल्या  दिग्दर्शक रवी जाधवनं सुरूवातीला जाहिरात विश्वात करिअर घडवलं. जाहिरातीनंतर  तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला, 'टाइमपास', 'टाइमपास २', 'न्यूड', 'नटरंग' सारखे यशस्वी चित्रपट रवी जाधवनं मराठी चित्रपटसृष्टीला दिले. नुकताच रवी जाधवचा 'रंपाट' चित्रपटही प्रदर्शित झाला. 

वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट तयार करण्यात  रवीचं मन रमतं. मला एकाच शैलीतल्या चित्रपटांची निर्मिती करायची नाही. एकाच  शैलीतील चित्रपटाची  निर्मिती करणारा दिग्दर्शक म्हणून लोकांनी मला ओळखू नये म्हणून मी  खूप मेहनत करून माझी जुनी प्रतिमा खोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं,  रवी 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

'वर्षाला एकच चित्रपट करण्यास माझी काहीच हरकत नाही. आकड्यांच्या फुगवट्यापेक्षा माझ्यासाठी गुणवत्ता ही नेहमीच महत्त्वाची असते. चित्रपटनिर्मिती हे अत्यंत सर्जनशीलतेचं क्षेत्र आहे. तुम्हाला प्रत्येकवेळी भन्नाट कल्पना सुचतील असं नाही. तुम्हाला त्यासाठी तेवढाच वेळ द्यावा लागतो असंही रवी जाधव म्हणाला. 

'मी चित्रपटसृष्टीवर पूर्णपणे विसंबून नाही. चित्रपट निर्मिती ही माझी आवड, माझा छंद आहे त्याकडे केवळ काम म्हणून न पाहता मला त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद  घ्यायचा आहे',  असंही रवी म्हणाला.