पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video: रविनानं केला रिक्षानं प्रवास, तिला पाहून चालकाचा आनंद गगनात मावेना

रविना टंडन

अभिनेत्री रविना टंडन हिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आपल्या भाचीच्या मेहंदीसाठी उशीर होत असल्यानं रविनानं चक्क रिक्षानं घर गाठलं. बॉलिवूडमधली ९० च्या काळातील प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रींचा हा साधेपणा रिक्षावाल्यालाही भावला. खुद्द रविना आपल्या रिक्षातून प्रवास करतेय यावर रिक्षाचालकाचाही विश्वास बसत नव्हता.  

चालकाच्या लग्नासाठी रविनाची कुटुंबीयांसोबत उपस्थिती

रविनानं रिक्षामधला  व्हिडिओ शेअर केला आहे.  रविनासोबत तिची मुलगीदेखील होती. रिक्षा चालकानं रविनाला चटकन ओळखलं. मी तुझा चाहता असून तुझे अनेक चित्रपट मी पाहिले आहेत, असंही रिक्षाचालकानं तिला सांगितलं. 

रविना लवकरच केजीएफ : २ मध्ये दिसणार आहे. हा  २०१८ साली प्रदर्शित झालेल्या  सुपरहिट कन्नड चित्रपट केजीएफ : १ चा हा  सीक्वल आहे. हा चित्रपट कन्नड, तामिळ, तेलगू, मल्ल्याळम, हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. 

दीपिकाच्या 'द इंटर्न'मधून ऋषी कपूर घेणार माघार?