पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रवीना टंडननं झायरा वसीमला सुनावले खडे बोल

झायरा- रवीना

'दंगल गर्ल' झायरा वसीमनं रविवारी बॉलिवूडमधून आपण एक्झिट घेत असल्याचं जाहिर केलं. 'दंगल' चित्रपटातून झायरानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या दमदार अभिनयामुळे ती अल्पावधितच लोकप्रिय झाली. त्यानंतर तिनं 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात दुसऱ्यांदा आमिर खानसोबत काम केलं. हा चित्रपटही सुपरहिट ठरला. पाच वर्षांच्या बॉलिवूडमधील अल्प प्रवासानंतर  झायरानं  आपली निवृत्ती जाहीर केली. तिनं सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली. झायराच्या अनपेक्षित एक्झिटमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, मात्र  अभिनेत्री रवीना टंडन हिनं झायराला खडे बोल सुनावले आहेत.

'बॉलिवूडनं भरपूर काही दिलं आहे मात्र केवळ दोन चित्रपटात काम करणारे  लोक या इण्डस्ट्रीत खूश नसतील तर त्यानं फार फरक पडत नाही. अशा लोकांनी शांतपणे या क्षेत्रातून निघून जावं आणि उलट्या दिशेनं जाणारे त्यांचे विचार त्यांच्यापर्यंतच मर्यादित ठेवावे',  असा टोला रवीनानं लगावला आहे. 

झायरानं सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहित आपली निवृत्ती जाहीर केली. या क्षेत्रात वावरताना मी अल्लाहच्या मार्गावरून भरकटले असंही तिनं म्हटलं. यापुढे अल्लाह मला मार्ग दाखवेन आणि मी त्याच मार्गाचा अवलंब करेन असं मत तिनं आपल्या भल्या मोठ्या पोस्टमध्ये मांडलं. बॉलिवूडमधलं  करिअर अल्लाहच्या मार्गावरून आपल्याला दूर नेत आहे अशी भीतीही तिनं आपल्या सोशल मीडियावरून पोस्टमधून व्यक्त केली. यावरून रवीना टंडन हिनं तिला खडे बोल सुनावले आहेत. झायरानं दबावाखाली येऊन ही पोस्ट लिहिली असल्याचं म्हटलं जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_) on

झायरानं काही  दिवसांपूर्वी 'दी स्काय इज पिंक' या चित्रपटाचं चित्रीकरण संपवलं. हा चित्रपट झायराचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.