पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चालकाच्या लग्नासाठी रविनाची कुटुंबीयांसोबत उपस्थिती

चालकाच्या लग्नासाठी रविनाची कुटुंबीयांसोबत उपस्थिती

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन आपल्या परिवारासह चालकाच्या लग्नासाठी उपस्थित होती. रविनाचे या विवाहसोहळयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  रविनासोबत तिची मुलगी राशा आणि पती अनिल थडानीही उपस्थित होते. 

रविना आणि तिच्या मुलीनं सुंदर ड्रेस परिधान केला होता.  रविनाचा तो विश्वासू चालक असल्याचंही समजत आहे. मुंबईत पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात रविनाला पाहून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

..म्हणून आजतागायत रविनानं पाहिला नाही 'अंदाज अपना अपना'

या सोहळ्यातले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रविना ही नुकतीच आजी देखील झाली. रविनाला राशा ही मुलगी आहे. पण त्याचबरोबर तिनं १९९५ मध्ये पुजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A Day at work 😁. Love the pampering ♥️😜

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

पुजा आणि छाया यांच्या आई - वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना सांभाळणाऱ्या नातेवाईकांकडून दोघींना त्रास व्हायचा. त्यानंतर रविनानं दोघींनाही दत्तक घेतलं होतं. रविनानं दत्तक घेतलेली मुलगी छाया २०१६ साली विवाहबंधनात अडकली होती. 

राम मंदिर- बाबरी मशिद प्रकरणावर कंगना करणार चित्रपटाची निर्मिती

छायानं दोन महिन्यांपूर्वी  गोंडस बाळाला जन्म दिला. त्यावेळी रविनानं  चिमुकल्याच्या आगमनाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला होता.