पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिनेत्री रवीना टंडनला आवडला अमेय- सईचा 'गर्लफ्रेंड' चित्रपट

रवीना टंडन

अमेय वाघ- सई ताम्हणकरचा 'गर्लफ्रेंड' चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अमेय आणि सई ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. २६ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. पण तत्पुर्वी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.  या स्क्रीनिंगसाठी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनदेखील उपस्थित होती. हा चित्रपट रवीनाला  खूपच आवडला.

अमेयला 'गर्लफ्रेंड' सईची ही गोष्ट भावली

चित्रपटाच्या सहनिर्मात्या अफीफा  नाडियादवाला यांनी 'गर्लफ्रेंड'च्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं.  या स्क्रीनिंगसाठी रवीनादेखील उपस्थित होती. तिनं  या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. अमेयनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रवीनासोबतचा फोटो शेअर केला आहे.  तिला भेटून झालेला आनंद  अमेयनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीत व्यक्त केला आहे. 

अमेयनं स्टाईलकडे अधिक लक्ष द्यावं, 'गर्लफ्रेंड' सईचा सल्ला

उपेंद्र सिधये दिग्दर्शित या चित्रपटात अमेय नचिकेत या मुलाची भूमिका साकारत आहे.