पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये ही अभिनेत्री आईच्या भूमिकेत

जयेशभाई जोरदार

रणवीर सिंग लवकरच 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात एका गुजराथी मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात बोमन इराणी आणि शालिनी पांडेदेखील मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटात रणबीरच्या आईची भूमिका कोण साकारणार यावरुनही पडदा उठला आहे. 

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह या चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका साकारत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच रणवीर सिंग हा बोमन इराणी, रत्ना पाठक शाह आणि अर्जुन रेड्डी फेम शालिनी पांडेसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाची कथा खूपच दुर्मिळ आहे मला ती खूपच आवडली. एका चांगल्या विषयावर 'जयेशभाई जोरदार' चित्रपट भाष्य करणारा आहे हा विषय माझ्या खूपच जवळचा आहे असंही रत्ना मिड डेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. 

रत्ना पाठक शाह

गणेश आचार्य नवोदितांचा गैरफायदा घेतो, तनुश्रीचा आरोप

या  चित्रपटात रणवीरच्या वडिलांच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणींची निवड करण्यात आली  आहे. या चित्रपटाची कथा खूपच वेगळी आणि खास आहे, या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हे भाग्य असल्याचं बोमन इराणी म्हणाले.

रणवीरनं या भूमिकेसाठी आपलं वजनही कमी केलं आहे. आतापर्यंत रणवीरनं साकारलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आणि हटके ठरणार आहे. 'जयेशभाई हा हिरो आहे. तो एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याच्या आयुष्यात एक गंभीर समस्या उद्भवते, अशावेळी हाच सर्वसामान्य माणूस एक  असामान्य कृती करत या संकटातून मार्ग काढतो. समाजात स्त्री- पुरुषांना समान वागणूक मिळाली पाहिजे असं मानणारी ही व्यक्तीरेखा असल्याचं रणवीरनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं.

रजनीकांतनंतर अक्षय कुमारही दिसणार Man vs Wild मध्ये