पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्काऱ्यांना मृत्यूदंड नाही तर जन्मठेपेची शिक्षा द्या- वहिदा रहमान

वहिदा रहमान

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणानं सारा देश सुन्न झाला. या प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. यानंतर देशभरातून  संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  एकीकडे बलात्काऱ्यांना ठार केल्याबद्दल  सामान्य लोक पोलिसांचं कौतुक करत आहेत तर दुसरीकडे या एन्काऊंटरवर अनेक प्रश्नचिन्हही उभे केले जात आहेत. यावर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. बलात्काऱ्यांना मृत्यूदंड नाही तर जन्मठेपेची शिक्षा ही योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 

कोकणातल्या या गावात 'अग्गंबाई सासूबाई'चं चित्रीकरण

मला  असं वाटतं की बलात्कारासारख्या कृत्याला माफी नाही मात्र त्याचबरोबर एखाद्याला मारुन टाकण्याचा अधिकार आपल्याला नाही त्यामुळे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा देणं योग्य आहे, असं मत ८१ वर्षांच्या वहिदा यांनी व्यक्त केलं आहे. 

'पानिपत' पुन्हा वादात, बंदीची मागणी

बलात्कार करणाऱ्या आरोपीला पुराव्यानिशी अटक केली तर त्याच्याविरोधात न्यायालयात केस चालवून लोकांचे पैसे वाया घालवू नये. त्याऐवजी अशा आरोपींना थेट तुरुंगात डांबून जन्मठेपेची शिक्षा द्यावी असं त्या म्हणाल्या.