पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाच वर्षे विभक्त राहिल्यानंतर कोंकणा- रणवीरचा घटस्फोटासाठी अर्ज

कोंकणा सेन शर्मा- रणवीर शौरी

गेली पाच वर्षे एकमेकांपासून विभक्त राहिल्यानंतर अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरीनं  घटस्फोटोसाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांनी संगनमतानं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. २०१५ पासून  कोंकणा आणि रणवीर विभक्त राहत आहेत. 

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

कोंकणा आणि रणवीर २००७ पासून एकमेकांना डेट करत होते. २०१० साली ही जोडी विवाहबंधनात अडकली. मात्र त्यांच्या संसार फार काळ टिकला नाही. २०१५ मध्ये कोंकणानं सोशल मीडियावर  रणवीरपासून विभक्त होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता  मात्र त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. आता त्यांनी घटस्फोटोसाठी  अर्ज केला आहे. 

दिल्ली हिंसाचार : हे गृहमंत्रालयाचे अपयश; रजनीकांत यांची टीका

 रणवीर  आणि कोंकणा या दोघांनाही आठ वर्षांचा मुलगा आहे. ते दोघंही मुलाचं संगोपन करणार आहे.  कोंकण आणि  रणवीरनं ट्राफिक सिग्नल, मिक्स डबल्स, आजा नचले सारख्या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.