पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणवीर-दीपिकाचा '८३' OTT वर प्रदर्शित होणार?, निमार्त्यांचं स्पष्टीकरण

८३ चित्रपट

रणवीर सिंह, दीपिका पादुकोनसह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला ८३ चित्रपट हा या महिन्यात प्रदर्शित होणार होता. भारतानं जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाची काहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांना दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती. मात्र लॉकडाऊनमुळे बॉलिवूडमधल्या मोठ मोठ्या चित्रपटांचं प्रदर्शन लांबलं आहे. अशातच '८३' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र असा कोणताही विचार नसल्याचं रिलायन्स एंटरटेन्मेटंनं स्पष्ट केलं आहे.

कोरोनामुक्त झालेल्या कनिकाने अखेर मौन सोडले

'आम्ही चित्रपटगृहातच हा चित्रपट प्रदर्शित करु. यासाठी  आम्ही पुढचे काही महिने वाट पाहायला तयार आहोत, जर पुढच्या सहा ते नऊ महिन्यात परिस्थिती बदलली नाही तर मात्र आम्ही विचार करु', अशी प्रतिक्रिया रिलायन्स एंटरटेन्मेंट समूहाचे सीईओ शिबाशिष सरकार यांनी पीटीआयला दिली. 

रामायणानंतर 'श्रीकृष्णा' मालिकाही पुनर्प्रकाशित होणार

चित्रपट प्रदर्शनाबद्दल पुढील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही चार ते सहा महिने नक्कीच प्रतीक्षा करू असंही त्यांनी सांगितलं.  १० एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटाचे वीएफएक्स आणि पोस्ट प्रोडक्शन काम अद्यापही बाकी आहे.