पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'टीम इंडिया जिंकली तर २०१९ च्या विश्वचषकावरही चित्रपट काढू'

८३ चित्रपट

रणवीर सिंगसह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या '83' या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या इंग्लडमध्ये सुरू आहे. कपिल देवसह १९८३ च्या वर्ल्डकपमधले अनेक दिग्गज माजी खेळाडू स्वत: चित्रपटातील कलाकारांना ट्रेनिंग देत आहेत. १९८३ साली भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकाच्या विजयाची कहाणी या चित्रपटात आहे. 

मलायकावरच्या प्रेमाची अर्जुननं पुन्हा दिली कबुली

या चित्रपटाचे सहाय्यक निर्माते मधू मंटेना यांनी २०१९ च्या विश्वचषकावरही चित्रपट काढण्याचा मानस बोलून दाखवला आहे. जर भारतानं यंदाचा विश्वचषक जिंकला तर यावर देखील चित्रपट नक्की तयार करू असं मंटेना म्हणाले. 

मल्लिका म्हणते, अभिनेत्यांच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले २०-३० चित्रपट

मधू मंटेना यांना भारत यंदाचा विश्वचषक जिंकेन अशी आशा आहे, त्यामुळे २०१९ च्या विश्वचषकावर चित्रपट तयार करण्यासंदर्भात बोलणी सुरू झाली असल्याचंही समजत आहे.