पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोबाइल नंबर विचारणाऱ्या रणवीरला नागपूर पोलिसांचं भन्नाट उत्तर

रणवीर सिंग

ट्विटवर ‘What is mobile number’ विचारणाऱ्या अभिनेता रणवीर सिंगला नागपूर पोलिसांनी भन्नाट उत्तर दिलं आहे. रणवीरच्या सोशल मीडिया पोस्टपेक्षा नागपूर पोलिसांनी रणवीरला दिलेल्या या भन्नाट प्रतिक्रियेची सर्वाधिक चर्चा आहे. 

'स्वत:च्या कमाईतून हॉटेलला भाडेतत्वावर दिलेलं पतौडी पॅलेस परत मिळवलं'

रणवीरनं सोशल मीडियावर त्याचा रेट्रो लूकमधला फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर करताना त्यानं हसिना मान जायेगी  चित्रपटातील व्हॉट इज मोबाइल नंबर गाण्यातील ओळी कॅप्शन म्हणून दिल्या आहेत. रणवीरच्या या पोस्टवर त्याच्या हजारो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

मात्र नागपूर पोलिसांनी दिलेली भन्नाट प्रतिक्रिया चर्चाचा विषय ठरली आहे. ‘What is mobile number’ विचारणाऱ्या रणवीरला नागपूर पोलिसांनी '१००'  असं उत्तर दिलंय. '१००'  नंबर हा पोलिसांचा क्रमांक आहे. अनेकांनी नागपूर पोलिसांच्या या हजरजबाबी उत्तराचं कौतुक केलं आहे. 

गरीब मुलांना मदत करतानाचे माझे फोटो काढू नका, जान्हवीची विनंती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ranveer Singh shared a picture of himself with a telephone and got a hilarious response from Nagpur Police