पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दीपिकाच्या इमारतीत रणवीरनं घेतला भाडेतत्वावर फ्लॅट ?

रणबीर- दीपिका

अभिनेत्री दीपिका पादुकोन बॉलिवूडमधली लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मुंबईमधील प्रभादेवी परिसरातील एका टोलेजंग इमारतीत दीपिकानं  २०१० मध्ये  एक आलिशान घर खरेदी केलं होतं. याच इमारतीत रणवीरनं भाडेतत्त्वावर फ्लॅट घेतला असल्याच्या चर्चा आहेत. 

अनुराधा पौडवाल यांच्यावर केरळच्या महिलेचा धक्कादायक आरोप

काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार रणवीरनं या इमारतीत तीन वर्षांसाठी आलिशान फ्लॅट घेतला आहे. ज्याचं मासिक भाडं हे ७ लाखांहून अधिक असल्याचं समजत आहे. रणवीरनं दोन वर्षांच्या भाड्याची किंमत चुकती केली आहे. तर शेवटच्या १२ महिन्यांसाठीचं भाडं हे ७ लाख ९७ हजार असल्याचही समजत आहे. ४ खोल्यांचा हा फ्लॅट असल्याचंही समजत आहे.

२०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या बॉलिवूड चित्रपटांची यादी

दीपिकानं  २०१० साली याच इमारतीत १६ कोटी रुपये मोजून घर घेतलं होतं, याच इमारतीत रणवीरनं भाडेतत्त्वावर घर घेण्याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. दीपिका आणि रणवीरनं २०१८ मध्ये विवाहगाठ बांधली. ही जोडी लवकरच ८३ या चित्रपटात दिसणार आहे.