पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अपना टाइम आएगा' iTunes च्या २०१९ मधील सुपरहिट गाण्यांच्या यादीत अव्वल

गली बॉय

फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग- आलिया भट्टच्या  'गली बॉय'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली. हिपहॉपचं हिंदी व्हर्जन थेट प्रेक्षकांच्या कानालाच भीडलं. या चित्रपटातलं 'अपना टाइम आएगा' हे गाणं iTunes च्या २०१९ मधली सुपरहिट गाण्यांच्या यादीत  अव्वल ठरलं आहे. 

आमिरचा 'दंगल' ठरला या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपट - Yahoo India

 iTunes नं २०१९ या वर्षांतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांची यादी जाहीर केली. या यादीत पहिल्या क्रमांकावर  'अपना टाइम आएगा' हे गाणं आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाला भारताकडून ९२ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीसाठी गली बॉय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

जयेशभाई जोरदार : रणवीर सिंग साकारणार गुज्जू छोकरो

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.