पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रेक्षकांसाठी ट्रिपल धमाका, 'सूर्यवंशी', 'सिंघम' आणि 'सिम्बा' एकाच चित्रपटात

'सूर्यवंशी', 'सिंघम' आणि 'सिम्बा' एकाच चित्रपटात

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटात प्रेक्षकांसाठी खास भेट असणार आहे. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात 'सिंघम' आणि 'सिम्बा' देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत. 

Gandhi Jayanti 2019 : या कलाकारांनी साकारली गांधीजींची भूमिका

अभिनेता  अजय देवगननं रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम' चित्रपटात पोलीस अधिकारी बाजीराव सिंघमची भूमिका साकारली होती. या भूमिकेला विशेष यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 'सिंघम रिटर्न'ही आला. त्यानंतर २०१८ मध्ये रोहित शेट्टीनं रणवीर सिंहला सोबत घेऊन 'सिम्बा' चित्रपट काढला. हा देखील पोलिस  अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित होता. या तिन्ही चित्रपटाला यश लाभल्यानंतर आता 'सूर्यवंशी'  चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होत आहे. 

'तिच्याकडे वासनेच्या नजरेनं बघणाऱ्यांची चीड येते'

या चित्रपटातील निर्णायक वळणावर रोहित शेट्टीचे 'सूर्यवंशी', 'सिंघम' आणि 'सिम्बा' हे तिन्ही पोलिस अधिकारी एकत्र दिणार आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून चित्रपटाचे लेखक आणि रोहित शेट्टी चित्रपटातील निर्णायक वळणावर काम करत आहेत. अखेर मनाजोगी कथा  त्यांना मिळाली आहे. त्यामुळे 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयसोबत अजय देवगन आणि रणवीर सिंहदेखील पाहायला मिळणार आहेत, अशी माहिती मुंबई मिररनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.  हैदराबाद फिल्मसिटीत चित्रपटाचं पुढील चित्रीकरण पार पडणार आहे.