पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे रणवीरच्या '८३' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

'८३' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या  पहिल्या विश्वचषकाची गोष्ट सांगणारा  '८३' चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार  होता. मात्र कोरोना विषाणूमुळे देशातील सद्य परिस्थिती पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मूळ तारीख रद्द करुन त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय  घेण्यात आला  आहे. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन मग प्रदर्शनाची अंतिम तारीख ठरवण्यात येईल असं चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हटलं आहे. 

...म्हणून सलमानसोबत काम करण्यासाठी श्रद्धानं दिला होता नकार

रणवीर सिंगसह अनेक  कलाकार या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. रणवीर या चित्रपटात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका  साकारत आहे. गेल्या दीड वर्षांपासून रणवीरनं या चित्रपटासाठी मोठी मेहनत घेतली आहे.  मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल. तूर्त सर्व चाहत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन  करण्यात आलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन विश्वातील चित्रपट, मालिका, जाहिरात, वेबसीरिज या सर्वांचं चित्रीकरण  बंद करण्यात आलं आहे.  चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे दर आठवड्याला ८० ते ९० कोटींचा फटका मनोरंजन विश्वाला बसत आहे. कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चित्रपटगृहही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला  आहे. अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही पुढे ढकलण्यात आली  आहे. 

...म्हणून बंगल्यात न राहता वांद्र्यातल्या फ्लॅटमध्येच राहतो सलमान खान