पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रानूच्या त्या व्हायरल फोटोमागचं सत्य अखेर समोर

रानूमंडल यांच्या व्हायरल फोटोमागचं सत्य समोर

गेल्या काही दिवसांपासून भडक मेकअपमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झालेल्या रानू मंडल यांच्या फोटोमागचं सत्य समोर आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा रानू यांचा मूळ फोटो नसल्याचं अखेर समोर आलं आहे. काही  लोकांनी रानू यांचा फोटो एडिट करून त्यांच्या रुपावरून हिन दर्जाची थट्टा केली होती. मात्र रानू यांचा कायापालट करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट संध्या यांनी खरा फोटो शेअर केला आहे. 

परीक्षक पद सोडलं नाही, विश्रांती घेतोय ; वादावर अनु मलिकचं स्पष्टीकरण

संध्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर रानू यांचा मूळ फोटो आणि एडिट केलेला फोटो शेअर केला आहे. या दोन्ही फोटोंमध्ये कमालीचा फरक आहे. तुम्ही पाहू  शकता की  मी केलेला मेकअप आणि एडिट केलेल्या फोटोमध्ये कमालीची तफावत आहे. विनोद करणं एका सीमेपर्यंत ठिक आहे कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरही हसू उमटतं. मात्र त्यातून एखाद्याच्या भावना दुखावणं हे साफ चुकीचं आहे', असं संध्या यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

हे फोटो पाहून तुम्हा सर्वांनाच सत्य काय आहे ते समजलं असेलच. इतकंच नाही तर संध्यानं एक व्हिडिओही शेअर केला आहे. आपल्या सुरेल आवाजामुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या रानू मंडल या मेकओव्हरच्या फोटोमुळे वादात सापडल्या होत्या. 

'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले अमेय खोपकर आणि मनसेचे आभार