पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लता मंगेशकर यांच्या प्रतिक्रियेवर रानू म्हणतात...

रानू मंडल

सोशल मीडियामुळे रातोरात सुपरस्टार झालेल्या रानू मंडल यांनी लता मंगेशकरांनी दिलेल्या  सल्ल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला लहानपणापासून लता दीदींचा सुरेल आवाज आवडायचा. त्या ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या तुलनेत मी नेहमीच लहान राहणार आहे असं रानू नम्रपणे म्हणाल्या.

रानघाट स्टेशनवर गाणी गाऊन रानू आपलं पोट भरायच्या. त्यांच्या सुरेल आवाजातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा है' गाण्यानं त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. रानू यांना मिळालेल्या प्रसिद्धीवर लता दीदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 

'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रीक्वल येणार, अनेक गुपिते उलगडणार

'माझ्यामुळे आणि माझ्या कामामुळे कोणाचं चांगलं होत असेन तर मी स्वत:ला सुदैवी समजते, पण तात्पुरता यश हे दीर्घकाळ टिकत नाही, माझं, मोहोम्मद रफी, किशोर दा किंवा आशा यांची गाणी गाऊन काही काळापुरता तुम्हाला प्रसिद्धी मिळेन मात्र ती अल्पावधीत नष्ट होईन, असं लता दीदी म्हणाल्या होत्या. दुसऱ्यांची गाणी गाण्यापेक्षा नवीन गाण्यांचा नव्या, संधीचा शोध घ्या असा सल्ला त्यांनी नवोदीतांना दिला होता. 

‘राम सिया के लव-कुश’ मालिकेत तथ्याशी छेडछाड केल्याप्रकरणी कलर्स वाहिनीला नोटीस

यावर नवभारत टाइम्सशी बोलताना रानू यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. लताजी माझ्या ज्येष्ठ आहेत त्यांच्या तुलनेत मी लहानच राहणार आहे, असं रानू नम्रपणे म्हणाल्या.  रानू यांना गायक हिमेश रेशमियानं गाण्याची संधी दिली. त्यांचं गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं.