पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' वादात, कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप

मर्दानी २

अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'मर्दानी २'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरची सोशल मीडियावर खूपच प्रशंसा झाली. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर आता वादात सापडला आहे. या चित्रपटात कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 

दिशाभूल करण्याचा हेतू नाही, सई, सिद्धार्थचं स्पष्टीकरण

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कोटा शहरातील काही स्थानिकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. शहराचं नाव अशाप्रकारे मलीन करणं पूर्णपणे चुकीचं आहे, चित्रपटाची कथा काल्पनिक असली तरी त्याच शहराच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे, अशी प्रतिक्रिया  कोटा शहराच्या स्थानिकांनी माध्यमांना दिली आहे. 

पृथ्वीराज: चित्रीकरणापूर्वी मानुषी-अक्षयची मुहूर्तपूजा

 मुलींचं अपहरण करून, त्यांच्यावर बलात्कार करून निर्घृण हत्या करणाऱ्या एका माथेफिरू नराधमाचा शोध घेणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट या चित्रपटात आहे. मात्र कोटा हे विद्येचं शहर आहे, या शहराचं चित्रपटातील नाव काढून टाकावं अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.