पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बंटी और बबली २' मध्ये दिसणार सैफ - राणीची जोडी

बंटी और बबली २

सैफ अली खान आणि राणी मुखर्जी ही रुपेरी पडद्यावरची हिट जोडी तब्बल ११ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे. 'हम तुम', 'ता रा रम पम' आणि 'थोडा प्यार थोडा मॅजिक' या चित्रपटानंतर आता 'बंटी और बबली २' मध्ये ही जोडी एकत्र दिसणार आहे. नुकतीच 'बंटी और बबली २' ची घोषणा झाली. या चित्रपटात 'गली बॉय' फेम सिद्धार्थ चुतर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शरवरी मुख्य भूमिकेत आहेत. पण त्याचबरोबर राणी आणि सैफ ही जोडीदेखील दिसणार आहे. 

प्रियांकाच्या लग्नातून उमेद भवन पॅलेसला मिळाले ३ महिन्यांचे उत्पन्न

राणी- अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला 'बंटी- बबली' चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा, गाणी इतकंच नाही तर 'बंटी- बबली' पासून प्रेरित कपड्यांची नवी फॅशनही त्यावेळी बाजारात पहायला मिळाली होती. या चित्रपटाची तुफान क्रेझ होती.  राणी- अभिषेकची जोडी तर पडद्यावरची हिट जोडी ठरली होती.  या चित्रपटाचा पुढचा भाग येत आहे. अर्थात या चित्रपटासाठी  राणी- अभिषेक या जुन्या जोडीला विचारण्यात आलं होतं. मात्र  काही गोष्टी जुळून आल्या नाही. तेव्हा अभिषेक बच्चन राणीसोबत चित्रपटात दिसणार नाही मात्र त्याजागी सैफची वर्णी लागली आहे. 

अक्षय कुमार याचा अमित शहांना महत्त्वाचा सल्ला
या चित्रपटाची कथा मला खूप आवडली. आजच्या पिढीच्या जवळ जाणारी ही कथा आहे. राणी  आणि मी यापूर्वी  चित्रपटात काम केलं आहे इतक्या वर्षांनी तिच्यासोबत पुन्हा काम करायला मी उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया सैफनं दिली आहे. माझ्यावर आणि अभिषेकवर जे प्रेम प्रेक्षकांनी केलं तेच प्रेम  नव्या जोडीवरही प्रेक्षक करतील अशी आशा राणी मुखर्जीनं व्यक्त केली आहे.