पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ब्रह्मास्त्र'साठी चाहत्यांच्या नशिबी प्रतीक्षा, प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली?

ब्रह्मास्त्र

आलीया भट्ट, रणबीर कपूर, अमिताभ बच्चनसह अनेक कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली होती. अखेर ४ डिसेंबर २०२० ही 'ब्रह्मास्त्र'च्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र आता हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता असल्याची बातमी बॉलिवूड हंगामा या संकेतस्थळानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.  

परदेशात असलेल्या प्रियांकानं मानले भारतातल्या त्या देवदूतांचे आभार

कोरोना व्हायरसमुळे ३१ मार्चपर्यंत मनोरंजन विश्वातील सर्वच चित्रीकरण बंद आहेत. त्यामुळे 'ब्रह्मास्त्र'चं काही चित्रीकरणही रखडलं आहे. चित्रीकरण रखडल्यानं कदाचित डेडलाइनपूर्वी चित्रपटाच्या तांत्रिक बाबी पूर्ण होऊ शकत नाही अशी शक्यता असल्यानं कदाचित हा चित्रपट डिसेंबरमध्ये नाही तर २०२१ मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

या चित्रपटाची चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत, मात्र चाहत्यांना अजून काही काळ वाट पहावी लागणार असंच दिसतंय. अद्यापही या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नसला तरी चित्रपटाचं प्रदर्शन पुन्हा एकदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाशी लढताना धर्मापलिकडे जाऊन विचार करा : अख्तर