पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया- रणबीरचं डिसेंबरमध्ये लग्न?

आलिया- रणबीरचं डिसेंबरमध्ये लग्न?

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे  दोघंही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणार हे जोडपं या वर्षाअखेरीस विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या दोन वर्षांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना कित्येकदा उढाण आलं मात्र दोघांनीही या विषयावर  मौन बाळगणं पसतं केलं. 

बडे दिलवाला! RRR साठी मानधन घेण्यास अजयचा नकार

 पण आता ही  जोडी विवाहबंधनात अकडणार असल्यासं म्हटलं आहे. राजीव मसांद यांच्या स्तंभात आलिया- रणबीर डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा उल्लेख आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनी  डिसेंबर अखेरीस कोणताही नवा प्लान  तयार न करण्याची विनंती मित्रपरिवारास केली आहे.

Oscars 2020 : ७१ लाखांच्या गुडी बॅगमध्ये दडलंय तरी काय?

कपूर आणि भट्ट कुटुंबात आलिया- रणबीरच्या लग्नाची तयारीही सुरु झाल्याचं म्हटलं आहे. आलिया आणि रणबीर हे दोघंही नुकतेच रणबीरचा भाऊ आरमान जैनच्या लग्नात दिसले होते. कपूर कुटुंबीयांना आलिया आवडली असून संपूर्ण कपूर कुटुंबीय दोघांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.