पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डिसेंबरच्या या तारखेला रणबीर -आलिया अडकणार विवाहबंधनात?

रणबीर कपूर - आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे  दोघंही गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असणार हे जोडपं डिसेंबर महिन्यात लग्न करणार आहेत अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. मीड डेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबरला ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. अनुष्का शर्मा- विराट कोहली, दीपिका पादुकोन- रणवीर सिंग प्रमाणे ते दोघंही डेस्टिनेशन वेडिंग करणार अशा चर्चा होत्या मात्र रणवीर आणि आलियानं आपला प्लान बदलला अशीही चर्चा आहे.

तापसी म्हणजे ब दर्जाची मिमिक्री आर्टिस्ट, रंगोलीचा पुन्हा 'पंगा'

त्यामुळे डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मुंबईतच या दोघांचा आलिशान विवाहसोहळा पार पडणार आहे. या दोघांच्या कुटुंबीयांनी  डिसेंबर अखेरीस कोणताही नवा प्लान  तयार न करण्याची विनंती मित्रपरिवारास केली आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबात आलिया- रणबीरच्या लग्नाची तयारीही सुरु झाल्याचं म्हटलं आहे. ऋषी कपूर यांची गेल्या वर्षभरापासून तब्येत ठिक नाही आणि याच कारणामुळे दोघांचं लग्न पुढे ढकललं असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेत्रीच्या वडिलांचा मृत्यू, लॉकडाऊनमुळे अंत्यदर्शनासही मुकली

ब्रह्मास्त्रच्या सेटवर या दोघांच्या प्रेमाची कळी खुलली. २०१८ मध्ये पहिल्यांदा या दोघांना अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात पाहण्यात आलं होतं.