पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणबीर- आलिया काशी विश्वनाथच्या दर्शनास

रणबीर आलिया

मे २०१८ पासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची बरीच चर्चा आहे.  'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर या दोघींची प्रेमकहाणी सुरू झाली.  रणबीर आलियाबद्दल खूपच गंभीर असून ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकेल अशा चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. सध्या ही जोडी 'ब्रह्मास्त्र'च्या चित्रीकरणासाठी वाराणसीमध्ये आहे. वाराणसीमधील वास्तव्याच्या काळात रणबीर- आलियानं प्रसिद्ध देवस्थान काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं. 

‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये हृतिक दिसणार बिग बींच्या भूमिकेत?

चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढत दोघांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सोशल मीडियावर काशी विश्वनाथ मंदिर परिसरातील त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. 'ब्रह्मास्त्र'च्या यशासाठी दोघांनी प्रार्थना केली.

तापसी म्हणते, कार्तिकच्या शेजारी मुलींची गर्दी

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आलिया आणि रणबीर ही जोडी पहिल्यांदा दिसली होती.  त्यानंतर काहीच दिवसात एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं आलियासोबतच नातं मान्य केलं  होतं. जी जोडी  लवकरच लग्न करणार अशाही चर्चा आहेत.  रणबीर आलियाच्या नात्याला  दोन्ही कुटुंबियांनी मान्यता दिली असून बरेचदा आलिया कपूर कुटुंबीयांसोबत वेळ व्यतित करतानाही दिसते.