लॉकडाऊनच्या काळात लोकांनी घरी थांबावं यासाठी रामायण, महाभारत या ८० च्या दशकातील गाजलेल्या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पुनर्प्रक्षेपण सुरु केल्यानंतर अल्पावधित रामायण ही पुन्हा एकदा सर्वाधिक रेटिंग असेलली मालिका ठरली आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच हिंदी भाषेतील मालिकेला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहेत.
त्याचप्रमाणे बार्कच्या यादीतही सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांच्या यादीत रामायणचा समावेश झाला आहे. रामानंद सागर यांची प्रस्तुती असलेलं रामायणाचं दिवसातून दोन पुनर्प्रक्षेपण करण्यात येतं. सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता डीडी नॅशनलवर ही मालिका पुनर्प्रसारित होते.
कोरोनाशी लढा : मुंबई, दिल्लीसाठी शाहरुखकडून अशी केली जाणार मदत
गेल्या महिन्यात १९ मार्चपासून मालिकांचं चित्रीकरण पूर्णपणे बंद करण्याच आलं आहे त्यामुळे अनेक खासगी वाहिन्यांवर मालिकांचे नवीन भाग प्रसारित होत नाही अशा वेळी सर्व वाहिन्यांवर जुन्या वाहिन्या दाखवल्या जात आहे.
रामायण, महाभारतबरोबरच डीडी नॅशनलवरही ८०-९० च्या दशकात गाजलेल्या शक्तीमान, ब्योमकेश बक्षी, फौजी, अलिफ लैला, चाणक्य, देख भाई देख मालिकांचेही पुनर्प्रक्षेपण करण्यात येणार आहे.