पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामायणातल्या सीतेनं शेअर केला पंतप्रधान मोदींसोबतचा जुना फोटो

दीपिका फोटो

'रामायण' या प्रसिद्ध मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दीपिका चिखालिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो खूपच व्हायरल होत आहे. १९९१ साली टिपलेल्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आहेत. दीपिका यांनी या फोटोतील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेता हृतिक रोशनकडून २५ लाखांची मदत

दीपिका या वडोदरामधून  निवडणूक लढवत होत्या त्यावेळी १९९१ साली टिपलेला हा फोटो आहे.  या फोटोत ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दिसत आहेत.

 दीपिका यांनी रामायणात साकारलेली सीतेची भूमिका खूपच गाजली होती. लॉकडाऊनच्या काळात रामायणाचे पुर्नप्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामायणाचं पुर्नप्रक्षेपण पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे दीपिका या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 

कर्ज घेईन मात्र माझ्या कर्मचाऱ्यांना पगार देईल, अभिनेत्याचा दिलदारपणा