पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रसिद्ध अभिनेता राम कपूरला ओळखणं अशक्य

राम कपूर

'बडे अच्छे लगते है', 'कसम सै' सारख्या अनेक मालिकांमधून लोकप्रिय झालेला छोट्या पडद्यावरील अभिनेता राम कपूरनं सध्या आपल्या फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष द्यायला सुरूवात केली आहे. रामनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो  शेअर केला आहे  ज्यामध्ये 'फिट' राम कपूरला ओळखणं चाहत्यांनाही कठीण झालं. मात्र रामनं आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलेलं पाहून चाहतेही खूश झाले आहेत. 

घरासाठी दुप्पट किंमत मोजणाऱ्यांपैकी मी नव्हे - तमन्ना

राम कपूरनं अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. 'स्टुडंट ऑफ द इअर', 'एटंज विनोद', 'मेरे डॅड की मारूती', 'शादी के साईड इफेक्ट' यांसारख्या अनेक चित्रपटात रामनं काम केलं आहे. मात्र इतर अभिनेत्यांच्या तुलनेत रामचं व्यक्तीमत्त्व थोडं वेगळं होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Wassssup peeps!! Long time no see

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

आता मात्र रामनं फिटनेसला अधिक प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. वजन घटवल्यानं रामला ओळखणं अशक्य झालं आहे. पण त्यानं फिटनेसकडे लक्ष दिलेलं पाहुन चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.