पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Raksha Bandhan 2019 : 'गरिबीच्या काळात तिनं राहायला घर दिलं'

धर्मेंद्र देओल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांनी ट्विटवर आपल्या मानलेल्या बहिणीसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. उमेदीच्या काळात तिनं राहायला जागा दिली होती. दरवर्षी ती राखी बांधायची. रक्षाबंधनला तिची नेहमीच आठवण येते अशी भावनिक पोस्ट धर्मेंद्र यांनी लिहिली आहे.

पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मीका सिंहवर AICWA ची बंदी

रक्षाबंधनच्या एक दिवस आधी ट्विटवर धर्मेंद्र यांनी आपल्या बहिणीचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे. ती माझ्या गावात राहायची. गरिबी आणि उमेदीच्या काळात माटुंग्यातील रेल्वे क्वॉटर्समधल्या तिच्या घरात तिनं मला राहायला जागा दिली. रेल्वे क्वॉटर्समधला खोली क्रमांक ७५ मधल्या बाल्कनीमध्ये मी राहायचो. दरवर्षी मला ती राखी बांधायची.  आता ती हयात  नाही, दरवर्षी राखी बांधायची. प्रत्येक रक्षाबंधनला तिची खूप आठवण येते अशी पोस्ट धर्मेंद्र यांनी लिहिली आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

त्याचप्रमाणे त्यांनी देशवासीयांना रक्षाबंधनच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.