पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये दिसणार भूमी- राजकुमारची जोडी

'बधाई हो'च्या सीक्वलमध्ये भूमी- राजकुमार

आयुष्मान खुराना, सान्या मल्होत्रा, निना गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेला  'बधाई हो' २०१८ सालच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक  ठरला होता. या चित्रपटाच्या यशानंतर लवकरच याचा सीक्वलही येत आहे. मात्र चित्रपटात आयुष्मान सान्या नाही तर भूमी पेडणेकर - राजकुमार रावची जोडी पाहायला मिळणार अशी चर्चा आहे. 

धर्मेंद्र यांचे नवे He Man रेस्तराँ महापालिकेकडून सील

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भूमी या चित्रपटात शिक्षिकेच्या भूमिकेत आहे तर राजकुमार महिला पोलिस ठाण्यात असलेल्या एकमेव पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे  भूमी आणि राजकुमार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे.

''मला आवडलेल्या चित्रपटांपैकी 'बधाई हो' हा एक चित्रपट आहे, मला या चित्रपटाच्या सीक्वलसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी कोणताही विचार न करता झटक्यात होकार दिला. मी आणि राजकुमार पहिल्यांदा एकत्र काम करत आहोत त्यामुळे मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे'' असं भूमी म्हणाली. 

Holi 2020 : घरच्या घरी तयार करा नैसर्गिक रंग

जून महिन्यात 'बधाई हो २ 'च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे तर २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.