पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'छिछोरे’ पाहून दिग्दर्शक राजकुमार हिरानीही झाले खूश

छिछोरे

बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांच्या आत १०० कोटींहूनही अधिकचा गल्ला जमवणाऱ्या ‘छिछोरे’ला प्रेक्षक, समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. श्रद्धा कपूर, सुशांत सिंह राजपूतची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं कौतुक प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी देखील केलं आहे. 

मेट्रो बांधकाम परिसरात अभिनेत्रीच्या गाडीवर दगड कोसळला

हिरानी यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हा चित्रपट भूतकाळातल्या अनेक आठवणी ताज्या करणारा चित्रपट आहे. हा चित्रपट भूतकाळात घेऊन जातो, जे शिक्षणासाठी वसतीगृहात राहिले आहेत त्यांची नाळ या चित्रपटासाठी नक्कीच जोडली जाईन. या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेत तुम्हाला तुमचे मित्र मैत्रीण दिसतील. ज्या अनमोल क्षणांचा आनंद तुम्ही तरुणपणी घेतला आहे ते क्षण या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा जगता येणार आहेत.’ असं राजकुमार म्हणाले.

मल्लिका शेरावत म्हणते, मुलांची जबाबदारी नको रे बाबा

श्रद्धा कपूर, सुशांत सिंह राजपूत यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट  काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. नितेश तिवारी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

'भूल भुलैया २' मध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत