पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चीनमध्ये प्रदर्शित झालेल्या २.० चित्रपटाने केली ९.५ कोटींची कमाई

२.० चित्रपट

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा २.० हा चित्रपट शुक्रवारी चीनमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसप्रमाणेच चीनमध्ये देखील या चित्रपटाने धमाकेदार कमाई केली आहे. अवघ्या एका दिवसामध्ये या चित्रपटाने तब्बल ९.५ कोटीची कमाई केली आहे. चीनमध्ये जवळपास ५० हजार स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला.

 VIDEO: नीतू कपूर यांचा तमिळ बोलतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

२.० हा चित्रपट शंकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा पहिला तामिळ चित्रपट आहे जो चीनमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा भारतातील सर्वात जास्त बजेटचा चित्रपट मानला जातो. हा चित्रपट रोबोटचा सिक्वल असून २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. जुलै महिन्यात तो चीनमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव तारीख पुढे ढकलत ६ सप्टेंबर करण्यात आली होती. 

वीणाने दिलेले बर्थडे गिफ्ट पाहून शिव झाला थक्क

दरम्यान, २.० या चित्रपटामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्याचसोबत या चित्रपटात अभिनेत्रई एमी जॅक्सन हिने देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबर २०१८ रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या लूकला चाहत्यांनी खूप पसंद केले. पहिल्यांदा अक्षय कुमारने या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारली आहे. 

महेश भट्ट यांच्या निधनाची अफवा पसरवणाऱ्यांवर संतापली पूजा भट्ट