डिस्कव्हरी चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'मॅन वर्सेस वाईल्ड' या शोमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. कर्नाटकातील बांदीपुराच्या जंगलात या विशेष भागाचं चित्रीकरण मंगळवारी पार पडलं. या चित्रीकरणानंतर बेयर ग्रिल्स यानं रजनीकांत यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भारतात विशेष भाग चित्रीत केला. त्यावेळी नवा इतिहास घडला. अब्जावधी लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. आता सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत विशेष शो चित्रीत करत आहोत. असं लिहित बेयर ग्रिल्सनं फोटो शेअर केला आहे.
बेयर ग्रिल्स गेल्या कित्येक वर्षांपासून हा शो करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सापडल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा, प्रतिकूल वातावरणात तग कसा धरायचा हे बेयर ग्रिल्स आपल्या शोमधून दाखवतो. या विशेष भागासाठी मंगळारीच बेयर ग्रिल्स भारतात दाखल झाले होते.
After our episode with Prime Minister @NarendraModi of India helped create a bit of TV history, (3.6 billion impressions), superstar @Rajinikanth joins me next, as he makes his TV debut on our new show #IntoTheWildWithBearGrylls on @DiscoveryIN. #ThalaivaOnDiscovery pic.twitter.com/WKscCDjPZc
— Bear Grylls (@BearGrylls) January 29, 2020
२८ ते ३० जानेवारीदरम्यान बांदीपुराच्या जंगलात चित्रीकरण पार पडणार आहे. यासाठी दिवसातून ६ तास चित्रीकरणाची परवानगी 'मॅन वर्सेस वाईल्ड'च्या टीमला देण्यात आल्याचं समजत आहे. चित्रीकरण करताना रजनीकांत यांना किरकोळ जखमाही झाल्या असल्याचं समजत आहे. रजनीकांत यांनी बांदीपुराच्या जंगलात पाच तास चित्रीकरण केलं.
पूजा भट म्हणते, ...म्हणून मी कधीच CAA-NRCला पाठिंबा देणार नाही