पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रजनीकांत यांची चित्रपटसृष्टीतील कामगारांना ५० लाखांची मदत

अभिनेता रजनीकांत

कोरोना विषाणूचा देशातील सर्वच उद्योगांना मोठा फटका बसला आहे. कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून केंद्र सरकारसह देशातील विविध राज्यांनी वेगवेगळे उपाय योजले आहे. देशातील चित्रपट, मालिका उद्योगालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोना विषाणूमुळे सर्वच ठिकाणी शूटिंग बंद करण्यात आले आहे. परंतु, यामुळे या क्षेत्रात अभिनयाव्यतिरिक्त इतर काम करणाऱ्यांची आर्थिक नाकेबंदी झाली आहे. अशा कामगारांच्या मदतीसाठी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांनी धाव घेतली आहे. रजनीकांत यांनी दक्षिण भारत चित्रपट सृष्टीतील यूनियनला ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. 

कोरोनामुळे स्थानिक बाजारात दिवसागणिक कोट्यवधीची घसरण

लॉकडाऊनमुळे घरी बसलेल्या चित्रपटसृष्टीतील कामगारांसाठी रजनीकांत यांनी पुढाकार घेत त्यांना ५० लाखांची देणगी दिली आहे. रजनीकांत यांच्या या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील उद्योगपतींना आवाहन करुन कामगारांचा पगार कपात करु नका अशी विनंती केली आहे. 

अभिनयातून राजकारणात प्रवेश केलेले रजनीकांत हे आपल्या समाजकार्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी इतर संकटावेळी अशाप्रकारची मदत स्वतःहून दिलेली आहे. 

आणि काय हवं? प्रिया- उमेश पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान, कोरोनाविरोधातील लढाईसाठी देशातील उद्योजकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. तसंच या उद्योजकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देखील मदत करण्याचे आवाहन केले आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ते त्यांचा १०० टक्के पगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या निधीसाठी देणार आहेत. तर वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी कोरोनाविरोधातील लढाईसाठी १०० कोटींचा मदत निधी देण्याचे वचन दिले आहे.

गुढीपाडवा : .. म्हणून वसंतात श्रीखंड खाणे अयोग्य!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Rajinikanth has donated Rs 50 lakhs to Film Employees Federation of South India Union workers Coronavirus