पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रजनीकांतच्या 'दरबार'नं चार दिवसांत कमावले इतके कोटी

दरबार

रजनीकांत यांचे  चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होणार हे समीकरण जणू ठरलेलं आहेच. गेल्या आठवड्यात ९ जानेवारीला देशासह जगभरात हा  चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं चार दिवसांत एकूण १५० कोटींची कमाई केली आहे.  'दरबार'ची निर्मिती संस्था असलेल्या लायका प्रोडक्शननं चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी जाहीर केली. भारतासह देशभरातील कमाईचा यात समावेश आहे. 

'अनन्या'मधून 'फुलपाखरु' फेम ऋता करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

रजनीकांत यांचा  'दरबार' तामिळ, तेलगू आणि  हिंदी अशा तीन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं सर्वाधिक  कमाई तामिळनाडूत केली आहे. तामिळनाडूत ९ जानेवारीला हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला होता.  हा चित्रपट लवकरच २०० कोटींहून अधिकचा टप्पा पार करेल असंही म्हटलं जात आहे. 

जवळपास २५ वर्षांनी रजनिकांत पोलिसाची भूमिका साकारत आहे. त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर रजनीकांत यांना या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. या चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त सुनील शेट्टी, प्रतिक बब्बर सारखे कलाकारही पहायला मिळणार आहेत.  बॉलिवूडमध्ये १० जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ' छपाक' आणि 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटासमोर 'दरबार'चं मोठं आव्हान होतं.

दीपिकाच्या जेएनयू भेटीवर 'छपाक'च्या दिग्दर्शिका मेघना म्हणतात...