पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

या दिवशी पाहता येणार 'Into the Wild' चा विशेष भाग

बेयर ग्रिल्स जानेवारी महिन्यात भारतात आला होता.

डिस्कव्हरी चॅनेलवरील 'Into the Wild' या कार्यक्रमाच्या विशेष भागात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या विशेष भागाचं चित्रीकरण गेल्या महिन्यात पार पडलं. 'मॅन वर्सेस वाईल्ड'  हा प्रसिद्ध शो करणारा साहसवीर बेयर ग्रिल्स जानेवारी महिन्यात भारतात आला होता. हा भाग कधी प्रसारित होणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. अखेर विशेष भागाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

पाच वर्षे विभक्त राहिल्यानंतर कोंकणा- रणवीरचा घटस्फोटासाठी अर्ज

२३ मार्चला रात्री ८ वाजता डिस्कव्हरीवर 'Into the Wild' या कार्यक्राचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. जगभरात फिरलेल्या बेयर ग्रिल्सनं पहिल्यांदाच एका भारतीय अभिनेत्यासोबत  चित्रीकरण केलं. 'Into the Wild' च्या विशेष भागात अक्षय कुमारही दिसणार आहे.

डिस्कव्हरीनं नुकताच टीझर प्रदर्शित करुन कार्यक्रमाची माहिती दिली आहे. कर्नाटकातील बांदीपुराच्या जंगलात या विशेष भागाचं चित्रीकरण पार पडलं होतं. यापूर्वी बेयर ग्रिल्सनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत विशेष भाग चित्रीत केला होता. 

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप