पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रजनीकांत - अक्षयचा 2.0 चीनमध्ये होणार प्रदर्शित

रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ब्लॉकबस्टर चित्रपट 2.0 पुढील महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटानं ५०० कोटींहून अधिकची कमाई करत नवा विक्रम रचला होता. हिंदी, तामिळ, तेलगू या भाषांत हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला होता. 

चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा  पहिला तामिळ चित्रपट ठरणार आहे. आतापर्यंत बॉलिवूड चित्रपटांना चीनमध्ये तुफान प्रतिसाद लाभला. या वर्षभरात 'हिंदी मिडियम', 'मॉम', 'अंधाधून' चित्रपटानं  बक्कळ कमाई केली. याच आठवड्यात चीनमध्ये हृतिक रोशनचा 'काबील' हा चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. तर रजनीकांत- अक्षय कुमार यांचा 2.0 १२ जुलैरोजी प्रदर्शित होत आहे.

 2.0 च्या स्पेशल इफेक्टसाठी  जगभरातील हजारो तज्ज्ञांनी मेहनत घेतली. दक्षिणेतील सर्वात बिग बजेट चित्रपटांपैकी  हा  एक चित्रपट होता. या चित्रपटातून अभिनेता अक्षय कुमारनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तो या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत होता. 

'रोबोट 2.0' या नावानं हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे चीनमधल्या तब्बल ५६ हजार स्क्रीन्सवर तो प्रदर्शित होणार आहे. यातल्या ४७ हजार स्क्रीन्स या थ्रीडी असणार आहेत. रजनीकांत यांचा चीनमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असल्यानं ते आणि चित्रपटाची संपूर्ण टीम  खूपच उत्सुक आहेत. भारतासह इतर देशात ५०० कोटींहून अधिकची कमाई करणारा रजनीकांत यांचा चित्रपट चीनी प्रेक्षकांनाही तितकीच भुरळ घालतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेन.