पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

२.० ला चीनमध्ये सर्वाधिक स्क्रीन्स मिळूनही कमाई असमाधानकारक

2.0

रजनीकांत- अक्षयचा सर्वाधिक चर्चेत असलेला २.० चित्रपट चीनमध्ये गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. कमाईच्या बाबतीत भारतात अनेक विक्रम रचणाऱ्या या चित्रपटाची चीनमधली कमाईची गाडी संथगतीनं पुढे जात आहे.

या चित्रपटानं तीन दिवसांत चीनमध्ये १८ कोटींची कमाई  केली आहे. मात्र ही कमाई समाधानकारक नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. २.० हा भारतातला बिग बजेट चित्रपट आहे. तसेच चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला तामिळ चित्रपट आहे. या चित्रपटाला चीनमध्ये एकूण ५० हजार स्क्रीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स असूनही तुलनेनं चित्रपटाला पहिल्या आठवड्यात मिळालेला प्रतिसाद हा काहिसा असमाधानकारक आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. 

ऐश्वर्यावरील वादग्रस्त मीम्सनंतर पहिल्यांदाच विवेक-अभिषेक आमने-सामने

'2.0'  हा चित्रपट  'रोबोट 2.0' या नावानं जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र तो सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात आला. एचवाय मीडियाचा  'पॅडमॅन' हा चित्रपट यापूर्वी चीनमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटामुळे वितरकांना नुकसान सहन करावं लागलं. जुलैमध्ये डिझ्नेचा 'दी लायन किंग' ही प्रदर्शित झाला. या चित्रपटामुळे  नुकसान होऊ नये म्हणून एचवायनं '2.0' च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. 

वयाच्या ५२ व्या वर्षीही तरुण दिसण्यामागच रहस्य सांगतोय अक्षय

पहिल्या आठवड्याची '2.0'  ची कमाई ही फारशी समाधानकारक नव्हती. मात्र एचवायचं नुकसान होऊ नये यासाठी या चित्रपटानं आता १७० कोटीहून अधिकची कमाई करणं अपेक्षित आहे.