पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रजनीकांत- अक्षयच्या '2.0' चं चीनमधलं प्रदर्शन रद्द होण्याची शक्यता

ऱजनीकांत २.०

सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ब्लॉकबस्टर चित्रपट '2.0' पुढील महिन्यात चीनमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र  त्याचं प्रदर्शन रद्द होणार असल्याच्या चर्चा आहेत. चीनमधील माध्यमांच्या माहितीनुसार  वितरकांना तोटा सहन करावा लागणार असल्याची भीती सतावत आहे. रजनीकांत यांचा '2.0'  हा चित्रपट  'रोबोट 2.0' या नावानं १२ जुलैला चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे चीनमधल्या तब्बल ५६ हजार स्क्रीन्सवर तो प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

टायगर- दिशा दिसले एकत्र, ब्रेकअपच्या चर्चा निव्वळ अफवा?

मात्र आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही अशा चर्चा आहेत. या चित्रपटाचं प्रदर्शन रद्द करण्यात आल्याची कोणताही अधिकृत माहिती अद्यापही समोर आली नाही.  एचवाय मीडियाचा  'पॅडमॅन' हा चित्रपट यापूर्वी चीनमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटामुळे वितरकांना नुकसान सहन करावं लागलं त्यामुळे '2.0' चं  प्रदर्शन रद्द करण्याची किंवा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

शाहरुखच्या आवाजातील 'दी लायन किंग'चा ट्रेलर प्रदर्शित

एचवाय मीडिया २.० मुळे  तोट्यात जाऊन नये म्हणून चित्रपटानं कमीत कमी १७२ कोटींची कमाई चीनमध्ये करणं अपेक्षित आहे. मात्र त्याच काळात डिझ्नेचा 'दी लायन किंग'ही प्रदर्शित होत आहे. त्यामुळे  '2.0' च्या कमाईला फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. आता यावर नेमका काय निर्णय घेण्यात येतो हे पाहण्यासारखं ठरेन.