पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पानिपत''च्या ट्रेलरचं राज ठाकरेंकडून कौतुक

पानिपत

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपटाचा ट्रेलर गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आला. पुढील महिन्यात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अर्जुन कपूर, संजय दत्त, क्रिती सॅनॉन प्रमुख भूमिकेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी देखील 'पानिपत' चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

'संकटकाळी शिवरायांचे स्मरण करतो'

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर दिग्दर्शक गोवारीकर यांचं आणि चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.  'दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण चित्रपट देखील नक्की पहा' असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे. 

'पानिपत' च्या तिसऱ्या युद्धावर 'पानिपत' कथा आधारलेली आहे. मराठ्यांच्या इतिहासातील जिव्हारी झोंबणारा पराभव म्हणजे 'पानिपत'चं युद्ध होय. या युद्धात मराठा सैन्याचं मोठं नुकसान झालं. युद्धभूमीवरचा हरएक मराठा जीवाची बाजी लावून अहमद शाह अब्दालीशी लढाला. या युद्धाची गोष्ट सांगणारा चित्रपट ६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. 'पानिपत'मध्ये अर्जुन कपूर सदाशिव भाऊ पेशव्यांच्या भूमिकेत तर क्रिती सॅनॉन ही पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्त यानं अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली आहे. 

फत्तेशिकस्त! स्वराज्याच्या शत्रूवर महाराजांचा सर्जिकल स्ट्राइक