पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज ठाकरे लतादीदींच्या भेटीला

राज ठाकरे लतादीदींच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात लतादीदींची भेट घेतली. श्वसनाचा त्रास होत असल्यानं लतादीदींना सोमवारी पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लतादीदी या ९०  वर्षांच्या आहेत. राज ठाकरे आणि लतादीदींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

अक्षयच्या 'पृथ्वीराज'मधून मिस वर्ल्ड मानुषी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

लतादीदींच्या तब्येतीबद्दल समजताच राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रार्थनाही केली होती. 'दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय.' असं भावनिक ट्विट राज ठाकरेंनी केलं होतं. 

लता मंगेशकर यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्या पूर्वीपेक्षा बऱ्या आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच  लतादीदींच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं होतं.

'रिमेम्बर एम्नेशिया'मध्ये पाहायला मिळणार मराठीसह अनेक हॉलिवूड कलाकार

'लतादीदींच्या आरोग्याबाबत अफवा पसरत आहे. त्यावर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवण्यापेक्षा त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा', असे आवाहन मंगेशकर कुटुंबियांनी ट्विटच्या माध्यमातून केलं. 

'भूल भुलैया २' मध्ये कार्तिक-किआरासोबत दिसणार अभिनेत्री तब्बू