पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वेतील आपातकालीन साखळी ओढणं करिश्मा- सनी देओलला पडलं महागात, २२ वर्षांनंतर अडचणीत

करिश्मा- सनी देओल २२ वर्षांनंतर अडचणीत

भाजप नेते आणि अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांना २२ वर्षे जुनं प्रकरण भोवलं आहे. १९९७ साली एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांनी एक्स्प्रेसची आपातकालीन साखळी ओढली होती, ज्यामुळे २५ मिनिटे ट्रेनला उशीर झाला होता. या प्रकरणात रेल्वे  कोर्टानं त्यांना आरोपी ठरवलं आहे.

सुबोध भावेच्या 'विजेता' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात

 १९९७ मध्ये करिश्मा आणि सनी देओल अजमेर जिल्ह्यात 'बजरंग' चित्रपटाचं चित्रीकरण करत होते. यावेळी दोघांनी  ए अपलिंक एक्स्प्रेसची आपातकालीन साखळी ओढली होती. ज्यामुळे ट्रेनला २५ मिनिटे उशीर झाला होता. त्यानंतर ११ मार्च १९९७ मध्ये रेल्वेच्या नियमांचा भंग केल्यामुळे करिश्मा, सनी  आणि टीनू वर्मा यांच्याविरोधात जीआरपी फुलेरा ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली होती.

'इंशाअल्लाह'तून सलमान बाहेर, आलियानं सोडलं मौन

 रेल्वेच्या नियमांचा भंग केल्याबद्दल या दोघांवर आरोप निश्चित करण्यात आले असून या प्रकरणाची सुनावणी  २४ सप्टेंबरला होणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:railway court has framed charges against Sunny Deol Karisma Kapoor for pulling emergency chain of a train