पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंचतारांकित हॉटेलमधल्या दोन केळ्यांची किंमत पाहून अभिनेताही चक्रावला

राहुल बोस

चंढीगडमधल्या पंचतारांकित हॉटेलमधल्या दोन केळ्यांची किंमत पाहून बॉलिवूड अभिनेता  राहुल बोसही चक्रावला आहे. दोन केळ्यांसाठी हॉटेलनं पाठवलेलं बिल पाहून त्यालाही धक्का बसला आहे. राहुलनं हॉटेलमधील बिलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

राहुल कामानिमित्त चंढीगडमधल्या  पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहे. जिमनंतर त्यानं हॉटेलमधून दोन केळी ऑर्डर  केली ज्याचं बिल ४४२. ५० रुपये एवढं  झालं. एका डझनसाठी मोजाव्या लागणाऱ्या किमतीपेक्षाही हे बिल १० पटींनी अधिक होते. 

'कारगिल विजय दिना'निमित्तानं 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' होणार पुनर्प्रदर्शित

राहुलनं याचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. कोण सांगतं की फळं ही तुमच्यासाठी हानिकारक नसतात, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचा  विश्वास बसेन असं लिहित राहुलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. बिलावर फ्रुट प्लॅटर असं लिहिण्यात आलं असून दोन केळ्यांवर जीएसटीही आकारला आहे. 

या व्हिडीओवर अनेक ट्विटर युजर्सनं प्रतिक्रिया दिल्या आहेत.