पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दबंग ३' मधून राहत फतेह अली खान यांची दोन गाणी वगळली

दबंग ३

'दबंग ३' साठी सुप्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांनी दोन गाणी पूर्वीच गायली होती. मात्र या गाण्यांचा चित्रपटात समावेश न करण्याचा निर्णय 'दबंग ३' च्या टीमनं घेतला आहे. राहत फतेह अली खान यांची गाणी वगळली असली तरी सलमान आणि त्यांच्यामध्ये कोणतीही कटुता नाही असं खान यांचे प्रवक्ता सलमान अहमद यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुलींच्या विश्वात नेणाऱ्या बहुचर्चित 'गर्ल्स'चा ट्रेलर लाँच

राहत यांनी यापूर्वी दबंगसाठी 'तेरे मस्त मस्त दो नैन' आणि 'नैना बडे दगाबाज' ही दोन गाणी गायली होती.  राहत यांच्या आवाजातील ती दोन्ही गाणी खूपच लोकप्रिय ठरली होती.  ''दबंग ३ साठी राहत यांनी दोन गाणी रेकॉर्ड केली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता सलमाननं ही गाणी वगळण्याचा निर्णय घेतला. सध्या दोन्ही देशांतील संबंध हे तणावपूर्ण आहेत. सलमानला वाद नको आहेत. त्यानं देशवासींयाचा विचार केला'', असं राहत यांचे प्रवक्ते सलमान अहमद बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

बेल बॉटम : गुप्तहेरांच्या विश्वातली थरारक कथा, अक्षय प्रमुख भूमिकेत

मात्र सलमान आणि राहत यांच्यात कोणतीही कटुता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सलमानचा दबंग ३ पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.