पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून स्वत:च्या लग्नात राधिकानं नेसली आजीची फाटलेली साडी

राधिका आपटे

लग्न हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. लग्नासाठी प्रत्येक मुलीची कित्येक महिने आधीपासून तयारी सुरू असते. भरजरी, उंची कपडे, महागडे दागिने, मेकअप यासाठी सढळहस्ते खर्च करायलाही मुली मागेपुढे पाहत नाहीत. त्यातून लग्न बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्रीचं असेल तर या खर्चाचं गणित न मांडलेलंच बरं. 

कपिल प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, उदित नारायण यांची पोलखोल

अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोन प्रियांका चोप्रा यांच्या लग्नातील आलिशान कपडे, साड्या चर्चेचा विषय ठरले होते. मात्र राधिका आपटेनं चक्क तिच्या लग्नात आजीची फाटलेली जुनी साडी नेसली होती असं तिने फेमिना मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.  राधिकानं  कोर्ट मॅरेज केलं, यावेळी तिनं आजीची खूप जुनी आणि ठिकठिकाणी फाटलेली साडी नेसली होती. 'मी कोर्ट मॅरेजच्या वेळी आजीची सर्वात जुनी साडी निवडली होती. 'मी ती यासाठी नेसली होती कारण माझं माझ्या आजीवर खूप प्रेम आहे. या जगातील सर्वात प्रिय व्यक्तींपैकी  ती आहे', असं राधिका म्हणाली.

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन

इतरांप्रमाणे महागड्या कपड्यांची हौस मला नाही, त्यावर पैसे उधळायला मला कधीही आवडलं नाही, मी लग्नाच्या पार्टीसाठी ड्रेस घेतला होता ज्याची किंमत १० हजारांहूनही कमी होती असं राधिकानं सांगितलं.