पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुष्कर- अमृताची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर

अमृता खानविलकर- पुष्कर जोग

अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. 'वेल डन बेबी' या आगमी मराठी चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ही गोष्ट आयुष्यातील सत्य घटनेपासून प्रेरित  आहे, आम्ही साध्या- सोप्या पद्धतीनं ती सर्वांसमोर मांडणार आहोत', असं पुष्करनं सांगितलं. 

आयुष्मानचा 'बाला' पुन्हा वादात, स्वामित्व हक्क भंगाचा तिसरा आरोप

'माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मला या चित्रपटाची कथा सुचली. मला हा अनुभव चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांसमोर पोहोचवायचा होता. पालकतत्वाचा हा प्रवास यापूर्वी कधीही रुपेरी पडद्यावर मांडला नव्हता. पालकत्व स्वीकारताना  जोडपं अनेक चढ उतारातून जात असतं, कुटुंबीयांचा दबाव, अनेक जबाबदाऱ्या, भावनिक चढाओढ अशा अनेक गोष्टींना त्यांना सामोर जावं लागतं, हे सर्व हलक्या फुलक्या पद्धतीनं चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे', असं पुष्करनं सांगितलं. 

दीपिकाच्या कपड्यांची अवघ्या दोन तासांत विक्री, संस्थेला करणार मदत

 'वेल डन बेबी' च्या निमित्तानं पुष्कर आणि अमृता पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. लंडन आणि ब्रिटनच्या अनेक भागांत चित्रपटाचं चित्रीकरण पार पडणार आहे.